| इच्छुक प्रभाग | : | प्रभाग क्रमांक २२ | |
| सदस्यता क्रमांक | : | १०९६३२३२८ | |
| नाव | : | सौ. सुहासिनी रमेश नायडू | |
| पतीचे नाव | : | रमेश नायडू | |
| वडिलांचे नाव | : | शांताराम बी. व्ही. | |
| आईचे नाव | : | मंजुळा शांताराम बी. व्ही. | |
| घरचा पत्ता | : | ई-वस, बिल्डिंग नं. ६, रूम नं. ७, सेक्टर-२, आदर्श अपार्टमेंट, नेरळ, नवी मुंबई. | |
| कार्यालय पत्ता | : | शॉप नं. १०, शारदा शॉपिंग कॉम्प्लेक्स, सेक्टर-२, शिरवण, विद्यालय जुनिअर कॉलेज अँड स्कूल, नेरळ, नवी मुंबई. | |
| संपर्क क्रमांक | : | ९७०२०६४२७० | |
| ईमेल आयडी | : | suhasininadul80987@gmail.com | |
| जन्मदिन | : | १८ सप्टेंबर १९८७ | |
| शिक्षण | : | एस.वाय.बी.एम.एम. | |
| इतर शिक्षण | : | संगणकाचे ज्ञान, स्पोकन इंग्लिश. | |
| व्यवसाय | : | गृहिणी |
| जिल्हा सचिव | : भारतीय जनता पक्ष, नवी मुंबई |
| जिल्हा अध्यक्षा | : नमो फाउंडेशन |
| जिल्हा अध्यक्षा | : ऑल इंडिया जनर्लिस्ट असोसिएशन |
| हरित सेना सदस्य | : महाराष्ट्र शासन |
| श्री दुर्गा माता सेवा ट्रस्ट (नौदणी) | : अध्यक्षा |
मी, सौ. सुहासिनी रमेश नायडू, प्रभाग क्रमांक २२ साठी भारतीय जनता पार्टीची अधिकृत इच्छुक उमेदवार म्हणून जनसेवेसाठी सज्ज आहे. माझे ध्येय केवळ निवडणूक जिंकणे नसून, राष्ट्रहितासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी माझ्या प्रभागामध्ये जनहिताचे प्रभावी कार्य करणे आहे. मागील अनेक दशकांपासून मी राजकारणविरहित वृत्तीने समाजसेवेत आहे. या अनुभवाच्या आधारावर, मी एक मूलभूत गरज ओळखली आहेः ती म्हणजे स्थानिक विकासाची अनिवार्यता. आजच्या विकसनशील नवी मुंबईत रहिवाशांना मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध असूनही, उच्चशिक्षण, रोजगार आणि आर्थिक विकासाच्या संर्धीसाठी अद्यापही त्यांना मुंबई महानगर क्षेत्रावर अवलंबून राहावे लागत आहे. स्थानिक पातळीवर सर्वांगीण विकास साधून स्वावलंबन निर्माण करणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर आहे असून प्राथमिक गरजा म्हणून विद्युत (वीज) आणि जल (पाणी) या अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध आहेत, परंतु इतर मूलभूत नागरी सुविधांचे प्रश्न देखील प्रलंबित आहेत. नेरुळ-जुईनगर परिसरामध्ये जुन्या बांधकामाची झालेली दैना व पुनर्विकासाची धूम आणि सध्यस्थित असलेले अनधिकृत बांधकामांचा प्रश्न असो. यासोबतच निर्माण होणारी वाहतूक कोंडी, स्वच्छता यांसारखे प्रश्न प्रमुख्याने समोर येत आहेत. नवी मुंबई स्थापनेपासून आजपर्यंत रस्त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. स्थानिक पातळीवर प्रभावी नियोजन, पारदर्शक प्रशासन व वेळेत अंमलबजावणी न झाल्यामुळे विकासकामे संथ गतीने होत असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या आदर्श नेतृत्वावर विश्वास ठेवून, लोकसेवेच्या भावनेतून माझा राजकारणात सक्रिय सहभाग असून आज देशाला आणि राज्याला स्वच्छ, पारदर्शक व जबाबदार लोकप्रतिनिधित्वाची नितांत गरज आहे. जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण असलेले, तसेच ते प्रश्न प्रभावीपणे शासनदरबारी मांडण्याची क्षमता असलेले लोकप्रतिनिधीच खऱ्या अर्थाने लोकशाही मजबूत करू शकतात. भारतीय जनता पक्षाच्या संस्कारांवर आणि विचारधारेवर विश्वास ठेवून, पक्षाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी देण्याची संधी मला मिळावी, जेणेकरून मी समाजहितासाठी, माझ्या प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी प्रभावीपणे कार्य करू शकेन.